मुख्यपान

संकल्पना

संस्थापका विषयी थोडेसे

महात्मा गांधीचे अनुयायी डॉ.मणिभाई देसाई यांनी शाश्वत ग्रामीण विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवून १९६७ मध्ये बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली. १९९३ मध्ये त्यांच्या देहावसनानंतर, बायफच्या कार्यकर्त्यांनी हे कार्य पुढे चालू ठेवले आहे व नवीन आव्हानांना अनुसरून कार्यक्रमांमध्ये सुयोग्य बदल केले गेले आहेत. २०२०-२१ आ. मणिभाई देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त, शाश्वत विकासाचा एक नवीन उपक्रम “डॉ.मणिभाई देसाई उन्नत ग्राम अभियान” सुरू करण्यात बायफला आनंद होत आहे.

पार्श्वभूमी  शाश्वत आणि संतुलित विकासासाठी प्रत्येक गावामध्ये तेथील अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याची मोठी गरज आहे. याद्वारे नाविन्यपूर्ण आणि उदयोन्मुख उपक्रमात ग्रामीण भागातील तरुणांसाठी, विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यांच्या सुयोग्य संगमातून, शाश्वत विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवून अर्थार्जनाच्या संधीची निर्मिती करता येईल. डॉ मणिभाई देसाई उन्नत ग्राम अभियानात खालील चार तत्त्वे आणि विकासाच्या सात स्तंभांच्या सुयोग्य मिश्रणावर आधारित भारतातील खेड्यांमध्ये सर्वसमावेशक परिवर्तन घडवून आणण्याची कल्पना आहे.

तत्त्वे

 1. मंत्र (मार्ग आणि साधने)
 2. तंत्र (उपाय आणि तंत्रज्ञान)
 3. दिशा
 4. गती (वेग)

स्तंभ

 • युवा केंद्रित:  स्थानिक उद्योजकतेच्या माध्यमातून गावातील विकास प्रक्रियेला आकार देण्यात युवा वर्ग अतिशय गतिमान भूमिका बजावू शकतो.
 • तितिक्षा: नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलास अनुकूल लवचिक उपजीविका कार्यक्रम;
 • शाश्वत वापर:  नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर आणि त्यांचे संवर्धन व संतुलित उपयोग;
 • हरित अर्थव्यवस्था:  अक्षय ऊर्जा, वनस्पतीजन्य साधने, माहिती-तंत्रज्ञान व ज्ञान-जाल यावर आधारित वर्तुळाकार अर्थव्यवस्था;
 • बिगर शेती ग्रामीण उद्योग: शेतीस पूरक व शेतीवर आधारित व हरित अर्थव्यवस्थेला पोषक ग्रामीण उद्योग;
 • सुनिश्चित उद्धिष्टे: शाश्वत विकासाची सुनिश्चित ध्येये व मार्ग;
 • मार्गक्रमनाचे टप्पे: ज्यायोगे प्रगतीच्या गतीचे मोजमाप केले जाईल.

डॉ. मणिभाई देसाई उन्नत ग्राम अभियानात ग्रामपंचायत, शेतकरी उत्पादक संस्था (एफ पी ओ), युवक मंडळ, बचत गट आणि पाणलोट क्षेत्र विकास समित्या (डब्ल्यू डी सी) यांसारख्या सामाजिक संघटनांच्या सहभागासाठी खुले असेल. विविध उपक्रमांच्या अंमलबजावणी साठी आणि उपलब्ध सरकारी विकास योजनांचा लाभ घेण्यासाठी बायफ मार्फत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध राहील.

विविध कार्यक्रमांतर्गत उपक्रमांच्या माहितीसाठी येथे  क्लिक करा 

en_USEnglish